बापाकडूनच बालिकेचे अपहरण! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : बापाकडूनच बालिकेचे अपहरण!

अपहृत मुलगी व संशयिताचा देवगड पोलिसांकडून शोध

पुढारी वृत्तसेवा

देवगड ः देवगड पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आरोपीने 2 वर्षांच्या बालिकेला तिच्या आईच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवगड पोलिसांनी आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे. विशेष म्हणजे अपहरणकर्ता हा त्या मुलाचा बाप आहे.

ओमकार सुनील बाणे (28) असे संशयिताचे नाव असून, त्याने हिमांशी ओमकार बाणे (2) या आपनल्या मुलीला तिच्या आईच्या संमतीशिवाय पळवून नेले आहे. ओमकार व त्याचा पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात देवगड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 137/2, 115/2, 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित ओमकार बाणे हा नांदीवली-लक्ष्मीनगर, कल्याण (पूर्व) येथे आपल्या आईच्या घरी असण्याची शक्यता आहे. पोलिस त्याच्यासह अपहृत मुलीचा शोध घेत आहेत. संबंधित व्यक्ती किंवा मुलगी कोणास मिळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत काहिही माहिती असल्यास तातडीने सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे (देवगड पोलीस ठाणे) यांच्या 9022123827 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT