वेंगुर्लेत दोन कुटुंबांत हाणामारी 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : घराच्या वापरावरून वेंगुर्लेत दोन कुटुंबांत हाणामारी

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले ः वेंगुर्ले शहरातील विठ्ठलवाडी येथे घरात राहण्याबरोबरच शौचालय वापराच्या वादातून दोन कुटुंबांत झालेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन्ही गटातील 7 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना शनिवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा.च्या सुमारास घडली.

विठ्ठलवाडी येथील उदय लक्ष्मण तांडेल (60) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिलीप भिकाजी गिरप, दीपश्री दिलीप गिरप व निकिता दिलीप गिरप अशा तिघांवर भारतीय दंड संहिता 118 (1), 115 (2), 352.351(2), 351(3) 5(3), व 5 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तर दिलीप भिकाजी गिरप (58, रा. वेंगुर्ले विठ्ठलवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वासुदेव तांडेल, उदय तांडेल, पांडुरंग तांडेल व सुप्रिया केळूसकर अशा चौघांवर भारतीय दंड संहिता कलम 118 (1), 115(2), 125, 3(5) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भगवान चव्हाण हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT