सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : नांदगाव येथे कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक

मोहन कारंडे

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव कोळंबा मंदिरासमोर नांदगावहून मुंबईकडे जाणा-या लेनवर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून रिक्षा चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. रोशन किरण गमरे, (मूळ रा.भायखळा मुंबई सध्या रा. नांदगाव) असे जखमी प्रवाशाचे तर मामुद अमीर काझी, (रा. असलदे, शिवाजी नगर) असे रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जीप कॅम्पस ही चारचाकी घेऊन अथांग योगेंद्र सामंत (वय २८, रा.गंगापूर रोड, नाशिक) हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना याच लेनवर विरूद्ध दिशेने रिक्षा घेऊन चालक मामुद काझी हे नांदगाव येथून प्रवाशी रोशन गमरे याला घेऊन ओटव फाटा नजीक घेऊन जात असताना दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातानंतर नागरीकांनी तात्काळ जखमी रिक्षा चालक व जखमी प्रवाशी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कणकवली अति. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शेडगे, किरण कदम, चंद्रकांत माने, एम.व्ही. गुरव, सरपंच रविराज मोरजकर आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.

SCROLL FOR NEXT