ओरोस : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे, विरोधी उमेदवाराला मदत करणे अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाया केल्याबदल 23 पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्षामधून सहा वर्षांसाठी तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे. यामध्ये जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष व जि. प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जि.प. सभापती वंदना किनळेकर, शर्वाणी गावकर, भाजपचे फोंडाघाट भागातील पदाधिकारी राजन चिके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत भाजपा पक्षाच्यावतीने अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. तरीही काही उमेदवारांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवून पक्षशिस्त भंग केला आहे. यासाठी 23 पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबन करण्याबाबतचे भाजपच्या वरिष्ठांनी आपल्याला आदेश दिले. या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण सहा वर्षांसाठी ही निलंबन कारवाई केल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले.
पक्षातून निलंबित केलेल्यांमध्येे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन बाळकृष्ण चिके (फोंडाघाट ता. कणकवली), माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग), श्रीम. सुजाता अजित पडवळ (तुळस, ता. वेंगुर्ला), जि. प. माजी सदस्या वंदना किरण किनळेकर (म्हापण, ता. वेंगुर्ला), विजय महादेव रेडकर (मातोंड, ता. वेंगुर्ला), जनार्दन रुक्मानंद कुडाळकर (आडेली, ता. वेंगुर्ला), केवळ तीन महिन्यांपूर्वी उबाठा शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले जि. प. माजी सदस्य मायकल डिसोजा (कोलगाव, ता. सावंतवाडी), जितेंद्र पांडुरंग गावकर (माजगाव, ता. सावंतवाडी), योगेश अशोक केणी (इन्सुली, ता. सावंतवाडी), स्वागत रघुवीर नाटेकर (इन्सुली, ता. सावंतवाडी), नितीन एकनाथ राऊळ (इन्सुली, ता. सावंतवाडी ), जि. प. महिला व बालकल्याणच्यामाजी सभापती शर्वाणी शेखर गावकर (आरोंदा, ता. सावंतवाडी ), उल्हास उत्तम परब (सातार्डा, ता. सावंतवाडी ), श्रीम. स्नेहल संदीप नेमळेकर (आरोंदा, ता. सावंतवाडी ), श्रीम. साक्षी संदीप नाईक (ता. दोडामार्ग ), श्रीम. सुप्रिया शैलेश नाईक (ता. दोडामार्ग), श्रीम. सुनीता कमलाकर भिसे (ता. दोडामार्ग ), प्रवीण नारायण गवस (ता. दोडामार्ग ), अनिरुद्ध फाटक (ता. दोडामार्ग), श्रीम. सोष्मिता अरविंद बांबर्डेकर (ओरोस, ता. कुडाळ), योगेश राजाराम तावडे (ओरोस, ता. कुडाळ ), रुपेश अशोक पावसकर (नेरूर, ता. कुडाळ), विजय वासुदेव नाईक (आडेली, ता. वेंगुर्ला )आदींचा समावेश आहे.