Indian Bison 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : रस्त्यावर अचानक आलेल्या गव्यांमुळे कारला अपघात!

वैभववाडी- नावळे मार्गावरील अपघात; सुदैवाने अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात वन्यप्राण्यांचा, विशेषतः गव्यांचा मुक्त संचार वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वैभववाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनकाका रावराणे यांच्या कारसमोर अचानक दोन गवे आडवे आल्याने मोठा अपघात टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाहनातील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडी गटारात घसरून गाडीचे किरकोळ नुकसान झालेे. वैभववाडी-नावळे मार्गावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला.

या घटनेमुळे तालुक्यातील रस्त्यांवर वाढलेल्या गव्यांच्या मुक्त संचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या अगोदरही गवारेड्यामुळे अपघात घडले आहेत.   

सज्जनकाका रावराणे हे शुक्रवारी रात्री ८ वा. च्या सुमारास सांगुळवाडी येथे घरी कारमधून जात होते. त्यांचा मुलगा वैभववाडी नगरसेवक विवेक रावराणे हे वाहन चालवत होते. सांगुळवाडी श्री रामेश्वर मंदिर परिसरात वाहन पोहोचताच अचानक दोन गवे रस्त्यावर आले. रात्रीची वेळ असल्याने हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता. समोर अचानक आलेल्या गव्यांना वाचविण्यासाठी चालक विवेक रावराणे यांनी प्रसंगावधान राखत कारला ब्रेक लावला. या प्रयत्नात कार गटारात गेली. या घटनेत वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. मात्र,कोणालाही दुखापत झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT