दुचाकी घसरून स्वाराचा मृत्यू; दुसरा गंभीर 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : दुचाकी घसरून स्वाराचा मृत्यू; दुसरा गंभीर

साटेली-भेडशी मैदानाजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील मैदानाजवळ रविवारी सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक युवक ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मुदस्सर मशुद सय्यद (२२, रा. आवाडे) असे मृत युवकाचे नाव असून दानिश हुसेन सय्यद (२१, रा. आवाडे) हा गंभीर जखमी झाला आहे. दानिश याच्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुदस्सर आणि दानिश हे दोघे रविवारी काही कामानिमित्त दुचाकीवरून दोडामार्ग येथे आले होते. काम आटोपून ते पुन्हा साटेली-भेडशीच्या दिशेने जात असताना साटेली-भेडशी येथील मैदानाजवळील वळणावर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी घसरून रस्त्यावर आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दोघांच्याही डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मुदस्सर यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गंभीर जखमी दानिश याला पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT