हिंगोली ते रिसोड मार्गावर भरधाव बसची दुचाकीला धडक; दोन जण ठार  File photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : पिंगुळीत दुचाकीची ट्रकला धडक; एक ठार, दोघे गंभीर

Sindhudurg Accident News | वेंगुर्ले मार्गावर रेल्‍वेब्रीजजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ - वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वेब्रीज नजिक बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. कुडाळहून पिंगुळीच्या दिशेने ट्रीपल सीट जाणा-या दुचाकीची समोरून कुडाळच्या दिशेने येणा-या आयशरला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील तीघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तिघेही नेरूर पंचशील नगर येथील रहिवासी असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT