अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

सतीश बागल यांची सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सतीश पंढरीनाथ बागल यांची पदोन्नतीने अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

शासनाच्या २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार, आस्थापना मंडळाच्या शिफारशीनंतर निवडश्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार सतीश पंढरीनाथ बागल यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

ही पदोन्नती शासनाने नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्यासाठी सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन अप्पर जिल्हाधिकारी मिळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT