बांदा-दाणोली मार्गावर मालवाहू ट्रकला अपघात  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : बांदा-दाणोली मार्गावर मालवाहू ट्रकला अपघात

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः बांदा-दाणोली मार्गावर ओटवणे तिठा येथे कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. लोखंडी प्लेट व स्टील ट्यूब वाहतूक करणारा ट्रक अपघातग्रस्त झाला असून सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही.

या ठिकाणी असणारा मोठा चढाव, रस्त्यावरचे खड्डे आणि गाडीत असलेला ओव्हरलोड माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन्‌‍ हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या चढावावर वाहन आवरण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकची समोरील दोन्ही चाक जमिनीपासून तब्बल 10 फूट वर उचलली गेली. काही क्षण वाहन हवेत लटकले. मागील बाजूस असलेला लोखंडी माल खाली घसरून जमिनीवर आल्याने वाहन मागे सरकले नाही किंवा पलटी झाले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात चालक सुखरूप बचावला. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने लोखंडी साहित्य बाजूला करून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT