जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींवर प्रशासक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींवर प्रशासक

निवडणूक न झाल्याने घेतला निर्णय; सर्वात जास्त ग्रा.पं. देवगड तालुक्यातील

पुढारी वृत्तसेवा

सर्वेश परब

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची मुदत 10 फेब्रुवारी रोजी संपली असून, त्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासकीय राजवट चालू झाली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकीय राजवट लागलेल्या सर्वात जास्त ग्रामपंचायती देवगड तालुक्यातील असून, या सर्व ग्रामपंचातींवरील प्रशासकीय राजवट पुढील निवडणुका होईपर्यंत राहणार आहे.

विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य यांची पंचायत निर्माण होते. 2021 सालात जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यांची मुदत कालच्या 10 फेब्रुवारीला संपली. तत्पूर्वी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे आवश्यक होते. परंतु त्या घेतल्या गेल्या नाहीत. परिणामी आता प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 432 ग्रामपंचायती असून जास्तीतजास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका 2022 सालात झाल्या आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षी 2027 सालात संपणार आहे. त्यावेळी या निवडणुका लागणार आहेत.

देवगड तालुक्यातील 23 ग्रा.पं.वर प्रशासकीय राजवट

सर्वात जास्त देवगड तालुक्यात 23 ग्रामपंचायतींची मुदत संपली असून तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. मुणगे ग्रामपंचायतीवर शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद शिंगारे, नाडण ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी विलास कोलते, मोंड ग्रा.पं.वर लक्ष्मीकांत जोशी, धालवली ग्रा.पं.वर अभिजीत मदने, शिरगाव ग्रा.पं.वर अभियंता रोशन सूर्यवंशी, वाडा ग्रा.पं.वर श्रीरंग काळे, वरेरी ग्रा.पं.वर मुख्यसेविका प्रियांका वाघ, पाळेकरवाडी ग्रा.पं.वर केंद्रप्रमुख लहू दहीफळे, पाटथर ग्रा.पं.वर कुणाल मांजरेकर, तळवडे ग्रा.पं.वर गंगुताई अडुळकर, टेंबवली ग्रा.पं.वर दिगंबर खराडे, कुणकेश्वर ग्रा.पं.वर तुषार हळदणकर, इळये ग्रा.पं.वर संतोष बिर्जे, मोंडपार ग्रा.पं.वर रमेश पेडणेकर, पुरळ ग्रा.पं.वर अभियंता अनिल तांबे, कातवण ग्रा.पं.वर मुख्यसेविका पूजा सावंत, लिंगडाळ ग्रा.पं.वर दीपक तेंडुलकर, मुटाट ग्रा.पं.वर दीपक बागुल, मिठबांव ग्रा.पं.वर अभियंता रूपेश पाटील, तांबळडेग ग्रा.पं.वर मुख्यसेविका कोमदिनी रसाळ, कोर्ले ग्रा.पं.वर अभिजीत मदने, रहाटेश्वर ग्रा.पं.वर अभियंता रोशनी जोपळे आणि गढीताम्हाणे ग्रा.पं.वर केंद्रप्रमुख प्रणाली मराठे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आचिर्णे, नाधवडेसह 13 ग्रा.पं.ची मुदत संपली

वैभववाडी तालुक्यात एकुण 13 ग्रामपंचायतींची मुदत संपली असून त्यावर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. आचिर्णे ग्रामपंचायतीवर केंद्रप्रमुख विजय केळकर, नाधवडे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी कांता जाधव, एडगाव ग्रा.पं.वर केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, सोनाळी ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी विशाल चौगुले, कुंभवडे ग्रा.पं.वर केंद्रप्रमुख संतोष गोसावी, भुईबावडा ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी सुप्रिया कांबळे, ऐनारी ग्रा.पं.वर आनंद चव्हाण, वेंगसर ग्रा.पं.वर पशुधन पर्यवेक्षक अजय सानप, खांबाळे ग्रा.पं.वर मुख्यसेविका विद्या गुरखे, सांगुळवाडी ग्रा.पं.वर गणपत देसाई, कोकीसरे ग्रा.पं.वर पशुधन विकास अधिकारी संजय शिरसाट आणि लोरे नं. 2 ग्रा.पं.वर मुख्यसेविका मनस्वी कांबळे यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.

भिरवंडे, गांधीनगर, तोंडवलीवर प्रशासकीय राजवट

कणकवली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2022 सालात झाल्या आहेत. आता तीन ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामध्ये भिरवंडे ग्रामपंचायतीचा समावेश असून तिथे कृषी विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर यांना प्रशासक म्हणून नेमले आहे. गांधीनगर ग्रा.पं.वर आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ठाकूर तर तोंडवली ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात केवळ दोन ग्रामपंचायतींच्या मुदत संपली असून आरवली ग्रा.पं.वर कृषी विस्तार अधिकारी सखाराम सावंत यांची आणि सागरतीर्थ ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी गुरूनाथ धुरी यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे.

मालवण तालुक्यातील 6 आणि दोडामार्ग तालुक्यात 3 ग्रा.पं.चा समावेश

मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामध्ये आडवली-मालडी ग्रा.पं.वर सुधीर गायकवाड, कुणकवळे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, गोळवण कुमामे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी सूरज बांगर, चिंदर ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी विनायक जाधव, खरारे पेंडूर ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी आत्माराम परब, मसदे-चुनवरे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत हे प्रशासक नेमण्यात आले आहेत. दोडामार्ग तालुक्यात तीन ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. कुडासे ग्रा.पं.वर कृषी विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, तेरवण मेढे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी श्रीरंग जाधव आणि आयनोडे हेवाळे ग्रा.पं.वर विस्तार अधिकारी जितेंद्र तायडे यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT