सिंधुदुर्गनगरी : बैठकीस उपस्थित ना.नितेश राणे. सोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील, डॉ. माणिक दिवे,कृषिकेश रावले, मनीष दळवी आदी. pudhari photo
सिंधुदुर्ग

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा : ना. नितेश राणे

Senior citizen policy: ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

पुढारी वृत्तसेवा

ओरोस: पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र, समस्या निवारण केंद्र स्थापन करावे,तसेच या धोरणात समाविष्ठ बाबींची पूर्तता करुन या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत, समिती सदस्य भालचंद्र मराठे, दादा कुडतरकर, अरविंद वळंजू, समाजकल्याणचे सहा.आयुक्त संतोष चिकणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या निवारण केंद्र स्थापन करावे, पोलिस स्टेशनच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावे, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार्‍या शासनाच्या विविधयोजना व कायदेशीर तरतुदी यांचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT