कृष्णा गोंड 
सिंधुदुर्ग

Sawantwadi self killed | स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत जीवन संपवले, सावंतवाडी-बाहेरचावाडा येथील प्रकाराचे गूढ

Sawantwadi self killed | स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत जीवन संपवले, सावंतवाडी-बाहेरचावाडा येथील प्रकाराचे गूढ

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडीः सावंतवाडी बाहेरचावाडा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिहारी सेंटरिंग कामगाराने घरातील स्वयंपाकाकरीता परण्यात येणाऱ्या चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. कृष्णा गोंड (३५) असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. त्याला उपचाराठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयताचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त होणार असून या कामगाराचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली याचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाहेरचावाडा येथे सरफराज ख्वाजा यांच्या घरात भाड्याने तीन बिहारी कामगार राहतात. ते ठेकेदार अजयकुमार राय यांच्याकडे सेंटरिंगचे काम करतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे ते संध्याकाळी कामावरून परत आले. त्यानंतर कृष्णा गोंड, अमित कुमार व धर्मेंद्र हे मजुरीच्या पैश्यांचा हिशोब करत बसले होते. या दरम्यान कृष्णा हा उठून पाणी पिण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेला. त्यांनतर काही वेळात त्याच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणूनअमित व धर्मेंद्र यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता कृष्णा गोंड हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्याला टेम्पोतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तपासणी करून चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डीवायएसपी राजेश भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या घरातील चाकूने मयताने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी निर्दशनास आले. तो चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याचे सहकारी अमित कुमार व सहकारी कामगार धर्मेंद्र या दोघांनाही चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

मयत कृष्णा याचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे, त्यांनतर हा घातपात की आत्महत्या याचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मगदुम यांनी दिली. कृष्णा गोंड हा वीस दिवसांपूर्वीच बिहार- सिवान येथून ठेकेदार अजयकुमार राय यांच्याकडे कामासाठी आला होता. तो पाच दिवसांपासून विचित्र वागत होता, कोणाशीही बोलत नव्हता. अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT