सावंतवाडी : जिमखाना मैदानाची पाहणी करताना आ. दीपक केसरकर. सोबत श्रद्धाराजे भोंसले, लखमराजे भोंसले, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, पूजा इंगवले आदी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडीत साकारणार 'परिपूर्ण' क्रीडा संकुल

आ. दीपक केसरकर यांनी घेतला कामाचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी शनिवारी आ. दीपक केसरकर यांनी केली. "सावंतवाडीत सर्व सोयींनी युक्त असे परिपूर्ण क्रीडा संकुल उभे राहणार असून, यामुळे स्थानिक खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. या क्रीडा संकुलामुळे सावंतवाडीतील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळणार असून, कामाचा दर्जा आणि गती राखण्याच्या सूचना आमदार केसरकर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

इनडोअर आणि आऊटडोअर खेळांवर भर

आ.केसरकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या संकुलात इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांसाठी स्वतंत्र सोयी उपलब्ध केल्या जाणार आहेत. मुलांमध्ये लहानपणापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मैदानी खेळ, खो-खो ,हायजंप, लॉंग जंप सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत तर बांदा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त जमीन हस्तांतरण करण्याची मागणी होत आहे. ही जमीन सार्व. बांधकाम विभागाचे आहे तर दोडामार्ग तालुक्यातील अतिरिक्त तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण उपसभापती सुनिता पेडणेकर तसेच प्रशासकीय अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, न.प. सार्वजनिक बांधकाम अभियंता तुषार सरडे, उप अभियंता सीमा गोवेकर.तर अर्चित पोकळे, प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT