Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| घरोघरी फिरणाऱ्या अनोळखी विक्रेत्यांपासून सावध राहा

न.प.ची कोणतीही परवानगी नाही; संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात सध्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून काही अनोळखी व्यक्ती घरोघरी फिरून उत्पादनांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अशा अनोळखी विक्रेत्यांच्या आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे, असे अधिकृत आवाहन सावंतवाडी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये फिरणारे हे अनोळखी विक्रेते नागरिकांच्या घरी जाऊन विविध वस्तूंची विक्री करत आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेची अधिकृत परवानगी असल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडे खातरजमा केली असता, अशा प्रकारे घरोघरी फिरून उत्पादनांची विक्री करण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणत्याही व्यक्तीला अथवा कंपनीला कसलीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरपरिषदेच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT