सावंतवाडीत दुचाकीला आग; स्वार जखमी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : सावंतवाडीत दुचाकीला आग; स्वार जखमी

बाहेरचावाडा-कुणकेरी रस्त्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा-कुणकेरी रस्त्यावर चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ही दुचाकी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने दुचाकी सोडून दिली; मात्र त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला आगीची झळ बसून ते जखमी झाले. ही दुचाकी सावंतवाडीतील वीज कंपनीचे कर्मचारी संतोष सीताराम साळवे यांची आहे.

कोलगाव कोकण कॉलनी परिसरात राहणारे संतोष साळवे हे सोमवारी दुपारी दुचाकीच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी बाजाराच्या दिशेने येत होते. वाटेत बाहेरचावाडा जवळ अचानक त्यांच्या दुचाकीतून धूर येऊन आगीने पेट घेतला. त्यांनी प्रसंगावधान राखत चालत्या दुचाकीवरून उडी टाकली. मात्र, त्यांच्या उजव्या पायाला आगीची झळ बसल्याने पाय भाजून ते किरकोळ जखमी झाले. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ सावंतवाडी अग्निशमन बंबाला पाचारण करून आग विझवण्यात आली. यामध्ये दुचाकीचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT