सावंतवाडीत 6 लाखांच्या दारूसह कार ताब्यात 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडीत 6 लाखांच्या दारूसह कार ताब्यात

सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‌‘ऑपरेशन ऑल आऊट‌’ दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. सावंतवाडी पोलिस ठाणे हद्दीत गोवा-मुंबई महामार्गावर 1 लाख 62 हजार रुपये किंमतीची गोवा दारू आणि 5 लाख रुपयांची झायलो कार असा एकूण 6 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दिलीप दत्ताराम पवार (वय 53, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. च्या सुमारास वेत्ये येथील चॉकलेट फॅक्टरीजवळ पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत गोवा दारूची ही वाहतूक उघड झाली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहा.पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार बस्त्याव डिसोजा आणि अंमलदार अमर कांडर यांचा समावेश होता. निवडणुकांच्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT