सावंतवाडी : बैठकीस उपस्थित दत्तू नार्वेकर, अमेय आरोंदेकर, महेश धुरी, अवधूत नार्वेकर, महेश पाटील आदी. pudhari
सिंधुदुर्ग

Sawantwadi | 'बाऊन्सर' आणणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका !

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी पं. स. इमारत बांधकाम निविदा प्रक्रिया दरम्यान काही कंत्राटदारांनी जि. प. कार्यालयात बाऊन्सर उभे करण्यात आले, त्यानंतर मारहाणीचा जी प्रकार घडला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बदनाम झाली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. याला जबाबदार ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राज्य कंत्राटदार महासंघाने गुरुवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबत गुरुवारी येथील विश्रामगृहात महासंघाची बैठक झाली. या बैठकीनंतर संघटनेने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदार आहोत. चार दिवसांपूर्वी जि. प. बांधकाम विभाग येथे पंचायत समिती सावंतवाडी या इमारतीच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान काही कंत्राटदारांनी जि.प. बांधकाम विभागा बारे आठ ते दहा बाऊन्सर दरवाजाचाहेर उभे करून ठेवले होते. हे बाऊन्सर येणाया जाणाऱ्या लोकांचे कागदपत्र तपासणी करत होते.

त्यांच्यासोबत एक कंत्राटदार त्या बाऊन्सरना येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातातील कागदपत्रे तपासण्याच्या सूचना करत होता. या सर्व प्रकारामुळे बांधकाम विभागात येणारे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे येणारे नागरिक व कंत्राटदार त्रस्त इथले होते. सदर प्रकार हा सुमते चार ते पाच तास चालू होता. काही पत्रकारांना सुद्धा त्या बाउन्सरांनी कागदपत्र तपासणी केल्याशिवाय बांधकाम विभागात सोडले नाही. हा सर्व खटाटोप पंचायत समितीचे कंत्राट मॅनेज करण्यासाठी केला जात हेोता, त्यामुळे राजकीय कार्यकत्यांनी जि.प. मध्ये येऊन बाऊन्सरांना यथेच्छ चोप दिला. या प्रकाराने जिल्हा परिषदची महाराष्ट्रामध्ये वदनामी झाली असून सदर प्रकार चयही कंत्राटदार व्यवतीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारचा आम्ही राज्य कंत्राट महासंपमार्फत निषेध नोंदवत आहोत. तसेच आपणास विनंती आहे, सदर प्रकाराची आपल्या खात्यामार्फत सखोल चौकशी करावी व शासकीय कार्यालयात बाउन्सर आणून दमदाटी करणान्या कंत्राटावर कडक कारवाई करावी, सदर व्यक्ती यात दोषी आढळल्यास त्यांला काळ्या यादीत टाकावे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य महासंघ करण्यास तयार आहे असे निवेदनात म्हटले आहे. कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी बी. एन. मूर्ती, दत्तू नार्वेकर, अमेय आरोंदेकर, महेश बुरी, महेश पाटील, अवधुत नार्वेकर, मेहेर पडते, जीवन केसरकर, प्रमोद सावंत, प्रताप मूर्ती, परेश धारगळकर, दया परब आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT