वेंगुर्ला : समुद्रकिनार्यावरील अवैद्य वाळू उपसाबाबत आरवली-टांक येथे अज्ञातांने लक्षवेधी बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा’ अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आली आहे.
समुद्रकिनार्यावरील वाळूची बैलगाड्याच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचे या बॅनर वरून नमूद करण्यात आले आहे. प्रजननासाठी किनार्यावर येणार्या ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्याचे आवाहनही या बॅनरद्वारे करण्यात आले आहे.
हातात पैशांची बॅग घेतला सूटमधील व्यावसायिक मच्छिमार व स्थानिक मच्छिमार यांना ‘समुद्र तुमच्या बापाचा नाही’ असे सांगत असल्याचे चित्र बॅनरवर दाखवण्यात आले आहे. या बॅनरमुळे वेंगुर्ला तालुक्यातील समुद्र किनार्यावर होणार्या अवैध वाळू उपसा अधोरेखित झाला असून प्रशासनाने हा उपसा रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.