उभादांडा येथे ३० गोणी खतासह टेम्पो जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : उभादांडा येथे ३० गोणी खतासह टेम्पो जप्त

कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : उभादांडा-मोचेमाड येथे बेकायदा खत वाहतुकीविरोधात वेंगुर्ले पोलिसांनी धडक कारवाई करून ३० गोणी खत जप्त केले आहे. या प्रकरणी खत वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त करत चालकावर गुन्हा दाखल केला.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस खत विक्री व वाहतूक याला प्रतिबंध करण्याकरीता कृषी विभागाने भरारी पथके कार्यरत केली आहेत. शुक्रवारी हे पथक वेंगुर्ले-शिरोडा मार्गाने जात असता त्यांना मोचेमाड येथे रस्त्याच्या बाजूला उभा टेम्पोचा संशय आला. पथकाने टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये खताच्या ३० गोण्या दिसून आल्या. चालकाकडे खत वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे टेम्पो ताब्यात घेत पथकाने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानुसार टेम्पो चालक मारुती शिवाजी कदम (४१ रा. तेलीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा नोंदविला

कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, सहा. कृषी अधिकारी जीवन परब, कृषिसेवक ज्ञानेश्वर सोनटक्के, वरचेमाड पोलिसपाटील अनुप नार्वेकर, वेंगुर्ले पोलीस अंमलदार योगेश सराफदार यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास ही कारवाई केली. खतांच्या गोण्यांबाबत खात्री केली असता, हे खत मेंगलोर येथून वेंगुर्ला येथे आणले असल्याचे चालकाने सांगितले. तसेच काही ठिकाणी त्या खताची विक्री केली असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT