आरवली सोन्सुरे येथे साकारले प्रभू श्रीरामाचे वाळूशिल्प File Photo
सिंधुदुर्ग

आरवली सोन्सुरे येथे साकारले प्रभू श्रीरामाचे वाळूशिल्प

Ram Navami 2025 : श्री रामाचे वाळूशिल्‍प पाहण्यासाठी भाविक, पर्यटकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा

रामनवमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. रामनवमीच्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी आरवली सोन्सुरे येथे प्रभू श्रीरामाचे सुंदर वाळूशिल्प साकारले आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला हे वाळूशिल्प पाहण्यासाठी सकाळपासून नागरिकांची तसेच पर्यटकांची गर्दी होत आहे. (Ram Navami 2025)

या वाळूशिल्पामध्ये श्रीरामाचा मुकुट, धनुष्य, दागिने आदी सूक्ष्म काम असल्याने त्यांना हे वाळू शिल्प घडवायला सुमारे तीन तासाचा कालावधी लागला. गेली अनेक वर्षे ते आरवली सोन्सुरे येथे विविध प्रकारची वाळू शिल्पे साकारत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी गणेश जयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज, श्री गणेश चतुर्थी, महाशिवरात्री उत्सव, एकादशी निमित्त श्री विठ्ठलाचे वाळू शिल्प, आर्मी डे, सावित्रीबाई फुले, शंभर वर्षे पूर्ण झालेले प्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे वाळू शिल्प यासारखी अनेक वाळूशिल्पे साकारली आहेत.

त्यांनी सिंधुदुर्गसह जळगाव, मुंबई, गोवा येथे, वायंगणी कासव महोत्सव आदी ठिकाणी तसेच नुकत्याच देवगड येथे झालेल्या जिल्हास्तरीय कासव महोत्सवात त्यांनी अप्रतिम वाळू शिल्प साकारले होते. ओडिसा येथे आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून त्यांची तीन वर्षे निवड झाली होती. त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT