अणावमध्ये आढळले दुर्मिळ खवले मांजर  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : अणावमध्ये आढळले दुर्मिळ खवले मांजर

वनविभागाकडून सुरक्षित सुटका

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव बामणवाडी येथे शुक्रवारी रात्री दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. हे खवलेमांजर तेथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी दिसून आले. याबाबतची माहिती अजित अणावकर यांनी तात्काळ कसाल वनपाल यांना कळविली.

त्यानंतर कडावल वन क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकात प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक उत्तम कांबळे (कसाल), पंकज घाडी, उदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे व सुनील आंगणे यांचा समावेश होता. स्थानिक ग्रामस्थांनीही मदत केली. अजित अणावकर, राजन जडये, विपुल हडकर आणि पार्थ अणावकर यांनी वनविभागाच्या पथकाला सहकार्य केले. खवले मांजर हे दुर्मीळ प्रजातीतील असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

वनविभागाने खवलेमांजराला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिक्षेत्र अधिकारी कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या खवलेमांजराला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT