कणकवली ः श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात श्री राम जन्मोत्सव पार पडला. यावेळी उपस्थित ब्रह्मवृंद, मानकरी व भाविक.  (छाया ः अनिकेत उचले)
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी रामनवमीचा उत्साह

श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला रामभक्तांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामुळे सर्वत्र ‘राममय’ वातावरण होते. ठिकठिकाणी पार पडलेला राम जन्मोत्सव सोहळा रामभक्तांनी ‘याची देही, याची डोळा’ श्री राम जन्मोत्सव अनुभवला.

कणकवली शहरासह तालुक्यातील नाटळ, हळवल, पिसेकामते, वरवडे, कलमठ, नांदगाव यासह अन्य गावांमध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्री रामनवमीनिमित्त शहरातील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात गेले काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रविवारी सकाळी श्रींची पूजा, अभिषेक हे विधी पार पडले. त्यानंतर श्री राम जन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. दुपारच्या सत्रात श्री राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. राम जन्मला गं सखे...राम जन्मला... यासह अन्य पाळणे गीते म्हटली गेली. रविवार असल्याने जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. आरती, मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम झाले. श्री देव काशिविश्वेश्वर मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावपुरुष, मानकरी, यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.

जन्मोत्सव सोहळ्यानंतर भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. सायंकाळच्या सत्रात लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री दैनंदिन आरती पार पडली. रात्री मंदिर परिसरात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हरिकीर्तन झाले. यात भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिर, प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमासह तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजारा करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ देखील भक्तांनी घेतला. सोमवारी रात्री श्रींची पालखी, हरिकीर्तन, लळीत अशा कार्यक्रमांनी या उत्सवाची सांगता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT