सहा वर्षांनंतर थांबा : सावंतवाडी येथे ‘राजधानी’चे जल्लोषी स्वागत 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सहा वर्षांनंतर थांबा : सावंतवाडी येथे ‘राजधानी’चे जल्लोषी स्वागत

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जल्लोषात गाडीचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी नवी दिल्ली-केरळ राजधानी एक्स्प्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकातील थांबा पुन:श्च मंजूर झाला आहे. मंगळवारी ही रेल्वे प्रथमच स्थानकात दाखल झाली. कोरोना काळात रद्द करण्यात आलेला हा थांबा तब्बल ६ वर्षांनी पुन्हा बहाल झाल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने जल्लोषात या गाडीचे स्वागत करण्यात आले.

गाडी क्र.२१४३२ तिरूअंनतपूरम ते हजरत निजामउद्दीन राजधानी एक्स्प्रेस ही गाडी नवी दिल्लाला जाण्यासाठी मंगळवारी सकाळी ९.३० वा. सावंतवाडी रेल्वेस्थानकात येताच उपस्थितांनी तिचे उत्साहात स्वागत केले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे रेल्वेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रेल्वेच्या दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

कोरोना काळात गरीबरथ आणि राजधानी एक्स्प्रेसचे सावंतवाडीतील थांबे बंद करण्यात आले होते. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गरीबरथ, राजधानी आणि मंगळूरू एक्स्प्रेसचे थांबे पुन्हा प्राप्त झाले आहेत. यावेळी संघटनेचे सचिव मिहीर मठकर म्हणाले, या स्थानकाला लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात आले असून, भविष्यात या नावाला साजेसे कार्य आणि विकास या स्थानकात व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT