राहुल नार्वेकर 
सिंधुदुर्ग

मातोंड देवस्थानसह विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार : राहुल नार्वेकर

जिल्हयातील प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅ. नाथ पै, प्रा .मधू दंडवते, माजी खा. सुरेश प्रभू तसेच माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे असे अनेक दिग्गज नेते झाले व आहेत. विधानसभेचा अध्यक्ष या सर्वोच्च पदावर काम करीत असताना कोकणच्या अनेक नररत्नांकडून प्रेरणा मिळते. सर्वांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांनी एकत्र येऊन विकास केला आहे. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विकासासाठी सर्वजण एकत्र येतात. ही राजकीय सभ्यता या जिल्ह्यात दिसून येते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मातोंड ( वेंगुर्ले ) येथे बोलताना व्यक्त केले.

विधानसभेचे पुन्हा अध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आलेल्या आमदार अॅड.राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (दि.१७) वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथील श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थ व देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रकल्प होणे आवश्यक असून जिल्हयातील विविध प्रश्न सुटण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह देवस्थान समिती अध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब, उदय परब, रविकिरण परब, तुकाराम परब, दिगंबर परब, दादा म्हालटकर, सुधाकर परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक संदीप भोसले , पोलीस पाटील सागर परब , नंदकिशोर घाडी, तुकाराम परब, कृष्णा घाडी, डॉ. कांडरकर, एम.मातोंडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी सातेरी, रामेश्वर, रवळनाथ देवस्थान च्या डेव्हलपमेंटसाठी निधी मिळावा , यासाठी मातोंड गावकर मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने अॅड.नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आगामी वर्षभरात देवस्थान व विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आ.नार्वेकर यांनी ग्रामस्थांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT