मळगाव : न्हावेली भोमवाडी येथील मानवी वस्तीत आलेल्या सुमारे सात फूट अजगराला सर्पमित्र गोविंद गवंडे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.
न्हावेली येथील जंगल परिसरातून भोमवाडीतील मानवी वस्तीती़ल शेतकरी हरमलकर यांच्या ओसरीला गावरान कोंबड्यांना आपला भक्ष बनवण्यासाठी आलेला अजगर ग्रामस्थांच्या दृष्टीत पडला.
त्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांनी मातोड पेंडूर येथील सर्पमित्र गोविंद गवंडे यांना बोलावले. सर्पमित्र गवंडे यांनी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.