देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील गटाराचे काम निकृष्ट! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील गटाराचे काम निकृष्ट!

नगरसेवक सुधीर तांबेनी वेधले मुख्याधिकार्‍यांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

देवगड ः देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील मॉर्डन बेकरी ते लाड घर येथील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. गटाराच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी न. पं. चे स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी न. पं. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री. तांबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मॉर्डन बेकरी ते लाड घर येथील गटाराचे काम करताना संबंधित ठेकेदाराने 40 ते 50 मीटरचे गटार खोदायचे काम जेसीबीने खोदाई केल्याने साईडची खोदाई वरच्या बाजूने रुंद व खालच्या बाजूने अरुंद झाल्यामुळे साईडची 6 इंच पडदीचे काँक्रिट खालच्या बाजूने 1 ते 2 इंच, तर वरच्या बाजूने 6 इंच होत आहे. याबाबत आपण यापूर्वी नगरपंचायतीकडे तक्रार केली असता संबंधित ठेकेदाराने त्याच्या दुसर्‍या दिवशी संबंधित गटाराच्या कामाबाबत काहीही कार्यवाही न करता तेथे साईडला सेंट्रींग प्लेट लावण्यात आले व तसेच काम पुढे सुरू ठेवण्यात आले. साईड पडदीला 6 इंच स्टील बांधायचे असताना 7 ते 8 इंचावर स्टील बांधून काम करण्यात आले आहे. खाली पी. सी. सी. 4 इंच घालणे आवश्यक होते. तेही संपूर्ण कामात घातले गेलेले नाही. तेथे डायरेक्ट स्टील बांधून 2 इंची काँक्रिट घालण्यात आले. त्यातील सिमेंट आणि वाळू वाहून गेली. फक्त खडी आणि स्टील शिल्लक राहिले आहे. या साईड रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्याने तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून हे काम दर्जेदार होण्यासाठी नगरपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी श्री. तांबे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT