Sindhudurg Achara Parwadi Shrimp farm Poisoning
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या आचरा-पारवाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. हे पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर आचरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास दुखापत उत्पन्न होईल, अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गतप्राण झालेल्या कोळंबीचे व विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेबाबत आचऱ्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. नुकसान करणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.