पालकमंत्री नितेश राणे pudhari photo
सिंधुदुर्ग

ओसरगाव टोलनाक्यावर ‘एमएच 07’ पासिंग गाड्यांना टोलमाफी

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : मी आमदार असताना ओसरगाव येथील टोल बंद पाडला होता. आता मी पालकमंत्री आहे, त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना कोणत्याही प्रकारचा टोल लागू देणार नाही. या टोलनाक्यावर 'एमएच ०७' पासिंग गाड्यांवर टोल आकारणी होणार नाही. ओसरगाव येथील टोलबाबत आपली नेहमीची ही भूमिका राहील, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, दिलीप भालेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते. ना. राणे म्हणाले, जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी, असे निवेदन मला दिले आहे. मी आमदार असताना सिंधुदुर्गवासीयांच्या हक्कासाठी हा टोल बंद पाडला होता. आता तर मी पालकमंत्री आहे, यामुळे टोलनाका जरी सुरू झाला तरी या टोलनाक्यावरून सिंधुदुर्ग पासिंगच्या एकाही वाहनांवर टोल लागू होणार नाही. याची दक्षता मी घेतली आहे. ओसरगाव टोलवर सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळणारच हा पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द आहे, चिंता करू नका, असे ते म्हणाले.

मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू

भाजपचे सरकार सत्तेत असताना तरी निदान हिंदूंना मारण्याची धमकी कोणी आम्हाला देऊ नये. आमचे सरकार असेपर्यंत हिंदूंना काहीही होऊ देणार नाही. सर्वांनी सरकारच्या नियमांचे पालन करायचे आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांनी मराठी शिकावी, त्यासाठी लागेल ती मदत करू, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT