Dandi Beach: दांडी समुद्रकिनार्‍यावर गावाबाहेरील व्यक्तींना पर्यटन व्यवसाय करण्यास विरोध File Photo
सिंधुदुर्ग

Dandi Beach: दांडी समुद्रकिनार्‍यावर गावाबाहेरील व्यक्तींना पर्यटन व्यवसाय करण्यास विरोध

गावातील पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत एकमुखी ठराव

पुढारी वृत्तसेवा

मालवण : दांडी गावा व्यतिरिक्त बाहेरील पर्यटन व्यावसायिकांना दांडी समुद्रकिनार्‍यावर कोणताही पर्यटन व्यवसाय करण्यास आमचा विरोध राहील, अशी एकमुखी भूमिका सागरी पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अन्वय प्रभू यांनी दिली आहे.

शनिवारी दांडी गाव पर्यटन व्यावसायिकांची बैठक पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली दांडेश्वर मंदिर येथे झाली. दामोदर तोडणकर, महेश कोयंडे, पांडुरंग पराडकर, दाजी जोशी, अजित आचरेकर, एजास मुल्ला, किरण हुर्णेकर, गौरव प्रभू आदी उपस्थित होते. दांडी समुद्रकिनारी स्थानिक पर्यटन व्यवसायांच्या पेक्षा बाहेरील पर्यटन व्यवसायांची संख्या वाढत आहे. बाहेरील व्यवसायांमुळे स्थानिकांना धंदे बंद करण्याची वेळ आली आहे. या बाहेरील पर्यटन व्यावसायिकांमुळे पर्यटन व्यवसायाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

यातून धडा घेऊन भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून दांडी समुद्र किनार्‍यावर स्थानिकांव्यतिरिक्त अन्य पर्यटन व्यावसायिकांना आमचा विरोध राहणार असल्याचा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग व अन्य वॉटर स्पोर्ट्सबाबत एकच दर ठरविण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. सागरी पर्यटन व्यवसाया संदर्भात नियमावली तयार करण्यासंदर्भात लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही अन्वय प्रभू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT