ओंकार हत्ती पुन्हा एकदा इन्सुली परिसरात दाखल (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ओंकार हत्ती पुन्हा एकदा इन्सुली परिसरात दाखल

परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बांदा : वन विभागाच्या देखरेखीखाली असलेला ‌‘ओंकार‌’ हत्ती पुन्हा एकदा इन्सुली परिसरात दाखल झाला आहे. सोमवारी रात्री त्याचा वावर वाफोली परिसरात आढळून आला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास तो इन्सुलीत दाखल झाल्याची माहिती मिळाली.

हत्तीच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण असून, वन विभागाकडून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या हत्ती शांत असल्याने कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान नागरिकांनी हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT