पालकमंत्री नितेश राणे pudhari photo
सिंधुदुर्ग

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावासाची शिक्षा

महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक खटल्यात जिल्हा न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : महामार्ग प्राधिकरण सावंतवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना जिल्हा न्यायाधीश -1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सोमवारी कलम 504 अन्वये दोषी ठरवत त्यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अन्य 29 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

4 जुलै 2019 रोजी हे प्रकरण घडले होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवलीचे तत्कालीन आ. नितेश राणे यांनी उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलवून घेतले होते. पाहणी दरम्यान कणकवली गडनदी पुलावर प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता. तसेच त्यांना महामार्ग सेफ्टीकरिता वापरल्या जाणाऱ्या कापडी पट्टीने बांधून ठेवून त्यानंतर ढकलत चालत नेले होते.

शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार

मंत्री नितेश राणे यांना झालेल्या शिक्षेप्रकरणी आम्ही न्यायालयात लगेच अर्ज केला. न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात दाद मागणार असल्याचे ना. राणे यांचे वकील ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT