मुंबई : जहाज बांधणी बैठकीत उपस्थित नितेश राणे व संबंधित अधिकारी.  
सिंधुदुर्ग

Shipbuilding Project : जहाज बांधणी प्रकल्पासाठी नांदगाव, दिघी, विजयदुर्ग या संभाव्य स्थळांचा आढावा

मंत्री नितेश राणे यांच्या यंत्रणांना सर्वेक्षण नियोजनाच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग तसेच सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

जहाज बांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ऑपरेटर्सना प्राथमिक स्वरूपातील माहिती व अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी जहाजबांधणी प्रकल्पासाठी संभाव्य स्थळांबाबत सादरीकरण केले.

यावेळी विविध स्थळांच्या तांत्रिक क्षमता, समुद्रातील खोली, भूगर्भीय स्थिती, संपर्क व्यवस्था आणि भविष्यातील औद्योगिक संधींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, हस्कोनिंग कंपनीचे जॉन सम्यूएल, श्री. बिजापूर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान तीन स्थळांसाठी प्राथमिक स्वरूपातील आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. किनारी भागात उपलब्ध जमीन मर्यादित असल्याने जहाजबांधणी प्रकल्पासाठी समुद्रातून भूभाग पुनर्भरण करून विकास करावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुख्य जहाजबांधणी सुविधा समुद्रातील पुनर्भरण केलेल्या भूभागावर उभारण्यात येणार असून, सहायक सुविधा त्यास जोडून विकसित करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT