Nitesh Rane pudhari photo
सिंधुदुर्ग

Nitesh Rane| जळून नष्ट होणारा चारा वैरण म्हणून राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांना देण्याचं नियोजन करा

पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेता पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरांसाठी ३,८०,००० मेट्रिक टन वैरण उपलब्ध आहे. तो पुरेसा असेल तर एरवी जळून नष्ट होणारा माळ रानातील चारा कापून तो राज्यातील दुष्काळी जिल्ह्यासाठी देण्यासाठी तातडीने उपाय योजना करा असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथील बैठकीत दिले.

दुष्काळाची परिस्थिती व त्यानुसार नियोजन, जिल्ह्यातील पशुधन व या जनावरांची वैरण व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पशुसंवर्धन अधिकारी समीर बिलोलीकर उपस्थित होते.

पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेती आणि पशुपालनासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, तसेच संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. तसेच हिरव्या चारासाठी मका बियाणे उपलब्ध करून दिले तर त्यासाठी लागणारे पाणी हा ही अडचणीचा विषय ठरेल त्यामुळे त्याचेही नियोजन करून निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT