दुसर्‍या छायाचित्रात शुभेच्छांचा वर्षाव करताना आ. नीलेश राणे यांचे कार्यकर्ते व चाहते. 
सिंधुदुर्ग

आ. नीलेश राणे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व

आ. दीपक केसरकर ः संजू परब मित्रमंडळ व सह्याद्री फाऊंडेशन आयोजित वाढदिवस कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः ज्यांच्या रक्तातच समाजसेवा आहे, त्या राणे कुटुंबांचे नीलेश राणे एक सदस्य आहेत. सन 1990 पासून राणेसाहेब जिल्ह्यात आल्यानंतर या जिल्ह्यात खूप मोठं परिवर्तन घडलं. राणे साहेबांनी कोकणासाठी जे काही केलं त्याची भरपाई लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशातून सिद्ध झाली. त्यांच्यासोबतच आज त्यांची दोन्ही मुलं त्यांचा समाजसेवेचा वसा जपत आहेत. आ. नीलेश राणे हे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व आहे. आता आमदार म्हणून ते अत्यंत अभ्यासपूर्ण काम करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो व याही पुढेही त्यांच्या हातून कोकण विकासाचं खूप मोठं कार्य घडो, अशा शब्दांत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी नीलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी येथील हॉटेल मँगो सभागृहात संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आ. नीलेश राणे यांचा वाढदिवस शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, जावेद खतिब, गुरुनाथ सावंत, मंदार नार्वेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, दिनेश गावडे, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,भाजप शहरप्रमुख अजय गोंदावळे, प्रल्हाद तावडे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना शिरोडकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

संजू परब म्हणाले, गेली 15 वर्षे मी नीलेश राणे यांच्यासोबत काम करीत आहे. बोललेला शब्द पाळणारा, मैत्रीला जपणारा नेता, तरुणांचा आयडॉल म्हणून नीलेश राणे यांची ओळख आहे. आज प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन ते राज्यभर काम करीत आहेत. विधिमंडळात एक अभ्यासपूर्ण आमदार म्हणून त्यांनी छाप पाडली आहे. अशा नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करताना निश्चितच अभिमान वाटतो. येणारा काळ हा नीलेश राणे यांचाच असून भविष्यात ते मंत्री म्हणून आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निश्चित येतील, अशा शब्दांत संजू परब यांनी नीलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.

सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ शुभेच्छा देताना म्हणाले, संजू परब हे माझे जवळचे मित्र असून सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम करणारं असं जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. नीलेश राणे यांना देवाप्रमाणे ते मानतात. साहेबांचा वाढदिवस दिमाखात साजरा करूया अशी इच्छा त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली व त्यातूनच आ. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सव आयोजित केला. आ. राणे यांनी अधिवेशनात कोकणातील अनेक विषय अभ्यासपूर्ण व खंबीरपणे मांडले आहेत. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न ते मांडत आहेत. त्यामुळे भविष्यातही त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक अपेक्षा असून, त्या निश्चितच पूर्ण होतील. सचिन वालावलकर म्हणाले, आ. नीलेश राणे यांच्या रुपाने शिवसेनेत एक आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. त्यांनी आपल्या जीवनात फार मोठा बदल केला असून, भविष्यातील एक उमदं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विधानसभेच्या सभागृहात त्यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची अनेकांनी दखल घेतली. देवबागसाठी कोट्यवधींचा निधी आणला. आता तीन राणे व जोडीला आ. केसरकर असल्याने जिल्हा सुजलाम् - सुफलाम् होईल, यात शंका नाही.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ. नीलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नीलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सावंतवाडीचे माजी उपसभापती विनायक दळवी, संतोष गांवस, ज्ञानेश्वर सावंत, क्लेटस फर्नांडीस, संदेश सोनुर्लेकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, परिक्षीत मांजरेकर, सुधा कवठणकर, दिनेश गावडे, सीताराम गावडे, भाजपच्या प्रदेश सदस्य तथा सावंतवाडी शहर महिला आघाडी प्रमुख मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सुशांत पांगम, झेवियर फर्नाडीस, दीनानाथ नाईक, प्रसन्ना शिरोडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, समीर पालव, संजय नाईक, प्रतीक बांदेकर, प्रवीण साठे, देव्या सूर्याजी, तात्या वेंगुर्लेकर, बंटी राजपुरोहित, सत्यवान बांदेकर, समीर पालव यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT