नेरूर : श्री देव कलेश्वर मंदिर येथे उत्सव कालावधीत पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.  pudhari photo
सिंधुदुर्ग

नेरूर श्री देव कलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री व रथोत्सव!

पाच दिवस मंदिरात विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : श्री क्षेत्र नेरूर (ता. कुडाळ) येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव आणि रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त गेले पाच दिवस मंदिरात विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. उत्सव कालावधीत दररोज रात्री होणारा श्रींचा पालखी सोहळा पारंपरिक थाटात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या उत्सवानिमित्त मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे. दररोज श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, बुधवारी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यानिमित्त मंदिर व परिसर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

या मंदिरात शनिवारपासून महाशिवरात्री उत्सवाला धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या उत्सव कालावधीत दररोज श्री कलेश्वर महाराजांची विविध रुपातील महापूजा बांधण्यात आली. तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दररोज दुपारी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चारही दिवस रात्री पुराण-पालखीतून श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर नंतर कीर्तन सादर झाले. या उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थ, विविध वस्तू, हॉटेल्स, खेळण्यांची दुकाने थाटली आहेत. श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूरव ग्रामपंचायत आणि नेरूर ग्रामस्थांनी चांगले नियोजन केले आहे. कुडाळ आगारातून भाविकांच्या सोयीसाठी यात्रा स्पेशल बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ही एसटी बससेवा सुरू राहणार आहे.

आज - उद्या विविध कार्यक्रम

बुधवारी (दि. 26) महाशिवरात्र उत्सव. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, 9 ते दु. 1 वा. भजने, सायं. 4 वा. उपाध्ये बुवा यांचे कीर्तन, रात्री 10 वा. पुराण, श्रींची मिरवणूक, 12 वा. दशावतारी गणपती दर्शन, श्रींचे वाजत-गाजत रथापर्यंत आगमन, विद्युत रोषणाईंसह श्रींची रथातून मिरवणूक, कलेश्वर दशावतार मंडळाचे नाटक, गुरुवारी (दि. 27) सायं. 5 वा. उपाध्ये बुवा यांचे सांगतेचे कीर्तन होणार आहे. या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT