कणकवली ः स्पर्धेत सहभागी नरकासुर.  (Pudhari File Photo(
सिंधुदुर्ग

Narak Chaturthi | नरकासुर स्पर्धेत हळवलचे रवळनाथ शिवराई मंडळ प्रथम

आक्राळविक्राळ नरकासुरांच्या प्रतिमा पाहण्यासाठी कणकवलीवासीयांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहरातील कांबळेगल्ली येथील वैभव मालंडकर पुरस्कृत व बाळ गोपाळ मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेत रवळनाथ शिवराई, हळवल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेदरम्यान आक्राळविक्राळ नरकासुरांच्या प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

सद्गुरू मित्रमंडळ फणसवाडी-वरवडे द्वितीय तर सुदर्शन मित्रमंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत शहर व शहरलगतच्या गावातील संघ सहभागी झाले होते. या स्पधेर्चे उद्घाटन प्रियांका मालंडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

बाळगोपाळ मंडळाचे अध्यक्ष शशांक बोर्डवेकर, उपाध्यक्ष वैभवी पाटकर, सचिव बाळू वालावलकर, हितेश मालंडकर, अविनाश चव्हाण, दिलीप मालंडकर, तेजस गवळी, महेश सोलासकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत विविध संघांनी तयार केलेले नरकासुर लक्षवेधी ठरले. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नरकासुरांच्या प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये टिपल्या. स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

वैभव मालंडकर, सौरभ पारकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नयन यादव, नयन सुतार, ओंकार सुतार, दुर्वांक मालंडकर, यश धुरी, सुहास सूर्यवंशी, सोमनाथ पारगावकर, अतिश कांदळकर, बंडू राणे यांनी मेहनत घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT