नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे अयोध्या प्रभू श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीरामाची भव्य मूर्ती रथात विराजमान करत भव्य मोटारसायकल रॅली काढली.
यावेळी श्रीराम भक्तांनी भगव्या वस्त्र, टोपी परिधान करत भगवे झेंडे गाडी, कारला बांधून नांदगाव तिटा येथून रॅलीची सुरुवात होत मोरयेवाडी राम मंदिर, नांदगाव गोसावी -कुंभारवाडी राम मंदिर आरती होऊन पुन्हा नांदगाव वरून बोभाटेवाडी हनुमान मंदिरा आरती होऊन नांदगाव तिठा येथे रथातील श्रीरामांची पूजा व आरती करत महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळेस परीसरातील हजारो श्रीराम भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.