Pernem Crime News Pudhari
सिंधुदुर्ग

Bihari Laborer Death | सावंतवाडीतील बिहारच्या कामगाराच्या मृत्यूचे गूढ उकलले; नैराश्यातून गळा कापून आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

Bihari Laborer Death | नैराश्यातून चाकूने गळा कापून आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
शहरानजीकच्या बाहेरचावाडा परिसरात गुरुवारी घडलेल्या बिहार येथील सेंट्रिंग कामगार कृष्णा नंदिनी गौड (वय ३८) याच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. कृष्णा याने आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून स्वतःच चाकूने गळा कापून आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून व पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

या प्राथमिक अहवालानंतर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या त्याच्या दोन सहकाऱ्यांची सुटका केली आहे. बिहार येथील रहिवासी असलेला कृष्णा गौड हा अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच सावंतवाडीत सेंट्रिंगच्या कामासाठी आला होता. तो बाहेरचावाडा परिसरात आपल्यासोबत काम करणाऱ्या महेंद्र कुमार आणि अमित कुमार या दोन सहकाऱ्यांसह भाड्याच्या खोलीत राहत होता.

गुरुवारी सायंकाळी कामावरून परतल्यानंतर खोलीवर तिघांमध्ये मजुरीच्या पैशांचा हिसाब झाला. त्यानंतर कृष्णा पाणी पिण्याच्या बहाण्याने आतील खोलीत गेला आणि तिथे त्याने अचानक स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून घेतले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाला त्याच्या दोन्ही सहкаऱ्यांनी तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे ফিরवली. सुरवातीला संशयावरून पोलिसांनी अमित कुमार व महेंद्र कुमार या दोघांना ताब्यात घेतले होते. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. शनिवारी वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना सादर केलेल्या प्राथमिक अहवालात कृष्णाने स्वतःच गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे हा प्रकार खून नसून आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही सहकाऱ्यांना सोडून दिले. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला असता, कृष्णा पूर्वी मुंबईतील वसई मार्केट येथे आपल्या नातेवाईकांप्रमाणे भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. तेथे काही लोकांचे देणे थकीत होते, तसेच आपल्या मूळ गावीही त्याच्यावर कर्ज होते.

या सततच्या आर्थिक तणावातून आणि कर्जाच्या बाजारारातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत कृष्णाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या घरी वृद्ध व आजारी आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

त्याला कोणताही भाऊ नसून कुटुंबात कमवणारा तो एकमेव आधार होता. तो स्वतः मोबाईलही वापरत नव्हता. त्याच्या या अकाली आणि दुर्दैवी निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील वैधानिक कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT