Munge Savantwadi Youth Missing
देवगड : मुणगे -सावंतवाडी येथील अनिल अनंत तेली (38) हा 16 जून रोजी सकाळी 7 वा. पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिची आई सुनिता अनंत तेली (51) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. अनिल तेली हा देवगड येथील एका हॉटेलमध्ये चार दिवस कामाला होता. 15 रोजी तो घरी गेला होता.
16 रोजी सकाळी 7 वा. आपण देवगड येथे कामावर जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला गेला. मात्र, तो कामाच्या ठिकाणी पोहोचला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यामुळे त्याची आई सुनिता तेली यांनी मुलगा अनिल हा बेपत्ता असल्याची फिर्याद देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. अनिल हा अविवाहित असून त्याला दारुचे व्यसन आहे, अशी माहिती तिच्या आईने फिर्यादीत दिली आहे. तपास हवालदार गणपती गावडे करीत आहेत.