सावंतवाडी : कधीकाळी भारतीय रेल्वेची ‘फ्लॅगशिप’ सेवा म्हणून ओळखली जाणारी मुंबई-मडगाव (22119/22120) ही तेजस एक्स्प्रेस आता मुंबई-गोवा रेल्वेमार्गावरील ‘सर्वात अविश्वसनीय’ प्रीमियम ट्रेन बनली आहे. वारंवार होणारा विलंब आणि रेल्वे रॅकची दुरवस्था यामुळे प्रवाशांचा संताप वाढला असून, या मार्गावर तातडीने ‘वंदे भारत’ रेक चालवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस एक्स्प्रेस गेल्या दोन महिन्यांत जवळपास आठवड्याला तीन तासांहून अधिक उशिराने धावत आहे. यामध्ये 14 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 9 ऑक्टोबर यांसारख्या तारखांना नोंदवलेल्या मोठ्या विलंबांचा समावेश आहे. हा विलंब केवळ प्रवाशांना होणारा त्रास नसून, रेल्वे प्रशासनाचे ‘प्रीमियम’ सेवेकडे झालेले दुर्लक्ष स्पष्टपणे दर्शवतो. ‘नॉन-मान्सून’ वेळापत्रकात तेजस एकाच दिवसात मुंबईहून मडगावला जाऊन परत येते. मार्गावरील किरकोळ विलंबांमुळे परतीच्या ट्रेन क्र. 22120 (मडगाव-मुंबई) वर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे ही गाडी अनेकदा रात्री उशिरापर्यंत धावते, जे ‘प्रीमियम’ ट्रेनसाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. विलंबसोबतच, तेजस एक्स्प्रेसच्या रॅकची भौतिक स्थितीही खालावली आहे.
इन्फोटेनमेंट सिस्टीम (खपषेींरळपाशपीं डलीशशपी)आणि अनेकस्वयंचलित दरवाजे (Infotainment Screens) बंद किंवा सदोष आहेत. अनेक सीट्स फाटलेल्या किंवा खराब झालेल्या आहेत. ट्रेनमधील स्वच्छता आणि आराम (Automatic Doors) मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
या सर्व कमतरता असूनही, रेल्वे या गाडीसाठी अजूनही 1.3 पट प्रीमियम भाडे आकारत आहे, जे वेगाच्या आणि गुणवत्तेच्या घसरणीमुळे समर्थनीय नसल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
हा बदल केल्यास मुंबई-गोवा मार्गाचा ‘प्रीमियम’ दर्जा पुनर्संचयित होईल. चिपळूण, कुडाळ आणि करमाळी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांना ‘वंदे भारत’ सेवा उपलब्ध होईल, ज्यांची या स्थानकांना सध्या कनेक्टिव्हिटी नाही. कोकण मार्गावरील प्रवाशांना आता एक विश्वसनीय, जलद आणि खऱ्या अर्थाने प्रीमियम सेवा अपेक्षित आहे, जी तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यामागील मूळ उद्देशाला न्याय देईल, असे रेल्वे विषयक अभ्यासक असलेले अक्षय महापदी यांनी म्हटले आहे. या संदर्भात रेल्वेकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर, अखंड कोकण रेल्वे सेवा समितीचे अक्षय महापदी यांनी मुंबई-मडगाव मार्गावर तेजस एक्स्प्रेसचा जुना रेक तातडीने ‘वंदे भारत’ रेकने बदलण्याची शिफारस केली आहे. महापदी यांच्या मते, सध्या धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना प्रशासनाकडून उत्तम देखरेख, मार्गावर प्राधान्य आणि उच्च्ा दर्जाची देखभाल दिली जाते, ज्याचा तेजस एक्स्प्रेसमध्ये पूर्णपणे अभाव आहे.