सावंतवाडी : शहरात गुन्हेगारी वृत्ती वाढत असून अलीकडेच गोमांसाचा मोठा साठा आढळून आला आहे. या गुन्ह्यात अटक करणात आलेला इसमाला यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यात या पूर्वी देखील अटक करण्यात आलेली आहे.
त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या इसमास तातडीने तडीपार करण्यात यावे, तसेच शहरात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका इसमास अटक करण्यात आली असून याने हा अंमली पदार्थ कोठून आणला?, तो कोठे विकणार होता? याबाबत सखोल चौकशी करून ही कीड मुळापासून उखडून टाकावी, अशी मागणी मनसे शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याजवळ केली.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर, तालुका उपाध्यक्ष राजेश मामलेकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, शंकर गावडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.