मिलिंद शिर्के (Pudhari Editorial)
सिंधुदुर्ग

Indian Honored by White House | हिंदळे गावचे सुपुत्र मिलिंद शिर्के यांना ‘व्हाईट हाऊस’कडून गौरवपत्र

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला शिर्के यांच्या देशसेवेचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे सुपुत्र असलेले व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले मिलिंद शिर्के यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून सन्मानित करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 ऑगस्ट रोजी पत्र पाठवून मिलिंद शिर्के यांच्या देशसेवेसह त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला आहे.

मिलिंद शिर्के सध्या अमेरिकेतील कोलंबस (जॉर्जिया) येथे वास्तव्यास असून, ते अमेरिकेच्या सशस्त्र दलात कार्यरत आहेत. त्यांच्या या देशसेवेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे पत्रातून कौतुक केले आहे. ‘तुमची सेवा प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या प्रशंसेस पात्र आहे.

अमेरिकेचे स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित रहावी यासाठी केलेल्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहे. कुठलाही देश महान राहतो तो तुमच्या सारख्या शूर सैनिकांच्या बलिदानामुळे आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांमुळेच,’ असे गौरवोद्गार ट्रम्प यांनी या पत्रातून व्यक्त केले आहेत.

याचबरोबर ट्रम्प यांनी या पत्रात आपण सर्व मिळून अमेरिकेचे वैभव आणि महानता पुन्हा प्रस्थापित करू व ‘गोल्डन एज ऑफ अमेरिका’कडे देशाला नेऊ. देव आपल्याला आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देवो, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत. हिंदळे गावच्या सुपुत्राला व्हाईट हाऊस कडून मिळालेला हा सन्मान केवळ गावाचाच नव्हे तर संपूर्ण देवगड तालुक्याचा मान उंचावणारा आहे. गावकर्‍यांसह तालुक्यात सर्वत्र अभिमान व आनंद व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT