सावंतवाडी : सावंतवाडी- माठेवाडा येथील ऐतिहासिक आत्मेश्वर मंदिरावर शेजारील भले मोठे आंब्याचे झाड मुळातून तुटून पडले. या झाडाचा पुढील भाग मंदिरावर समोरच्या भागावर पडला, त्यामुळे छपराचे तसेच जवळ उभ्या मॅक्स पिक अप टेम्पोचेही नुकसान झाले.
बुधवारी स. १० वा. ही घटना घडली. माठेवाडा येथील हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो, मात्र ही घटना घडली तरी सुदैवाने अनर्थ टळला. माठेवाडा -आत्मेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या शेखर सिध्दये याच्या मालकीचे घराशेजारील भले मोठे आंब्याचे जुने झाड मुळातून तुटून आत्मेश्वर मंदिराच्या दर्शनी भागावर पडले. घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. या झाडाचा बुंधा मंदिराच्या छपपरावर पडल्याने काैले, वाशे तुटून साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. तर झाडाचा काही भाग मंदिराच्या बाजूलाच उभ्या पिक टेम्पोच्या हौदयावर पडला त्याचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच वीज तारा तुटून नुकसान झाले आहे.