Deepak Shelar 
सिंधुदुर्ग

Deepak Shelar : मालवण शहर स्वच्छ, नशामुक्त अन् गुन्हेगारीमुक्त ठेवणार

दीपक शेलार; अवैध धंदे, नशाखोरी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मालवण : परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि आगामी उपक्रमांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून अकरा दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर कोणीही करू नये, तसेच सर्व गणेशभक्तांनी शांततेत विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

येत्या काळात मालवण पोलिस ठाण्याच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जाणार आहेत. यात अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, नशाबंदी तसेच अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक नजर ठेवली जाणार आहे. जे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देतात, त्यांचे पहिल्या टप्प्यात समुपदेशन व जनजागृती केली जाईल. मात्र, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित पालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT