दीपक केसरकर (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Political News | तीनही पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार!

Local Body Elections | सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही नगरपरिषद निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sindhudurg Alliance Politics

सावंतवाडी : सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही नगरपरिषद निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार आहे. मागील निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होणार नाही, अशी माहिती आ. दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या पहिल्या टप्प्यातील काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपक केसरकर यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुधा कवठणकर, विद्याधर परब, हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.

आ. केसरकर म्हणाले, मागील पालिका निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे काही ठिकाणी महायुतीला अपयश आले. मात्र, यावेळी तसे होणार नाही. तिन्ही ठिकाणी महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढणार आहोत. महायुतीतील मतभेद दूर करण्यासाठी संपर्कमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या पहिल्या टप्प्यातील काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर तात्पुरती भाजी मंडई तेथे हलवून दुसर्‍या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल. अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीत नगरपरिषदेच्या े काही विभागांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात येणार आहे आणि नगरपरिषदेच्या इमारतीची गळती थांबवण्यासाठी स्लॅब टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT