Vijaydurg Fort 
सिंधुदुर्ग

Vijaydurg Fort : विजयदुर्ग किल्ला तटबंदी संवर्धनासाठी 86 लाखांच्या निधीस मान्यता

पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदी भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने 86 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

समुद्राच्या सततच्या लाटांमुळे आणि नैसर्गिक झिजेमुळे दर्या बुरुजाच्या तटबंदीचा काही भाग कमकुवत झाला होता. तसेच भिंतीखाली अंडरकट पोकळी निर्माण झाली होती. ही ऐतिहासिक रचना जतन करण्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपी अंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उपमंडळामार्फत काम केले जाणार आहे. सदर आरसीपीला पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांनी मान्यता दिली आहे. विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचा कणा मानला जातो. अशा ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही याचा मोठा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT