सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-बुर्डीपुल येथे गुरुवारी दुपारी एक चिरे वाहतूक करणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने त्यातील चिरे रस्त्यावर पसरले, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मात्र, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.