सावंतवाडी ः उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव आणि हडपसर-हिसार या विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना आता या गाड्यांच्या अधिक फेर्यांचा लाभ घेता येणार आहे.
गाडी क्रमांक 01103/01104 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी आता 9 जून पर्यंत धावणार आहे. यापूर्वी ही गाडी 5 मे पर्यंत चालणार होती, त्यानंतर ती 26 मे पर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा 9 जून पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे. ही गाडी करमाळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबेल.
यासोबतच, गाडी क्रमांक 04726/04725 हडपसर-हिसार-हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या फेर्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ही गाडी आता 30 जून पर्यंत धावणार आहे.
यापूर्वी ही गाडी 25 मे पर्यंत चालणार होती, त्यानंतर 26 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या विशेष गाड्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह आरक्षण उपलब्ध आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ही सुधारणा ट्रेन क्रमांक 16336 / 16335 नागरकोइल - गांधीधाम-नागरकोईल साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये करण्यात येत आहे. सध्या ही गाडी 01 द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2 ढळशी अउ), 06 तृतीय श्रेणी वातानुकूलित (3 ढळशी अउ), 08 शयनयान (डश्रशशशिी), 04 सामान्य (ॠशपशीरश्र), 01 भोजनयान (झरपीीूं उरी), 01 जनरेटर कार आणि 01 एसएलआर (डङठ) असे एकूण 22 एलएचबी (ङकइ) डब्यांसह धावते. आता या गाडीतील एक शयनयान डबा कमी करून त्याच्या जागी द्वितीय श्रेणी वातानुकूलित श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.