Wildlife Crime | ज्वेलर्समधून बिबट्याचे दात, नखे, सुळे जप्त; सुवर्णकारास अटक 
सिंधुदुर्ग

Wildlife Crime | ज्वेलर्समधून बिबट्याचे दात, नखे, सुळे जप्त; सुवर्णकारास अटक

कुडाळ येथे वन विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ/ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. कुडाळ बाजारपेठेतील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकत बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयवांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने अटक केली असून, कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

३० जून रोजी सावंतवाडी वनक्षेत्रपाल यांना कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वन विभागाने तातडीने चक्र फिरवत सावंतवाडी वनक्षेत्रपाल, कर्मचारी आणि कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कुडाळ बाजारपेठ येथील मसुरकर जेम्स या दुकानाची अचानक झडती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT