संग्रहित छायाचित्र pudhari photo
सिंधुदुर्ग

विजयदुर्ग समुद्रात एलईडी मासेमारी करणारी बोट जप्त

LED fishing ban: ड्रोनच्या मदतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

देवगड : विजयदुर्ग मधील समुद्रात ‘मुक्ताई’ या मच्छीमारी नौकेवर एलईडी मासेमारी करणार्‍या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे. सागरी मासेमारीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, नीतेश राणे यांच्या आदेशानुसार ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या ड्रोनच्या मदतीने एलईडी ना ैकेवर झालेली जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.

सदर ड्रोन देखरेखीत सौ. प्रज्ञा प्रभाकर पेडणेकर यांच्या ‘मुक्ताई’ नावाच्या नौकेचा (नोंदणी क्रमांक: IND-MH-5-MM²-3604) अनधिकृतपणे एल.ई.डी. लाइटच्या सहाय्याने मासेमारी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावर परवाना अधिकारी, देवगड यांनी सागरी कायद्याच्या तरतुदींनुसार नोटीस जारी करत नौका व संबंधित सामग्री जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 17 जानेवारी रोजी नौका मालकाने नौका व सामग्री परवाना अधिकार्‍यांच्या ताब्यात दिली. नौकेवरील सुमारे 8 ते 10 लाख रुपये किंमतीच्या एल.ई.डी. लाईट पुरवणार्‍या उपकरणांसह नौका जप्त करण्यात आली आहे.

जप्त नौका विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी व परवाना अधिकारी, देवगड) यांनी प्रतिवेदन सादर केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT